धोकादायक वळणावर वारंवार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:22 PM2020-07-10T21:22:34+5:302020-07-11T00:15:06+5:30

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Frequent accidents on dangerous turns | धोकादायक वळणावर वारंवार अपघात

धोकादायक वळणावर वारंवार अपघात

Next

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शिंदेगावापासून ओझरच्या दहावा मैलपर्यंत रिंगरोड बनविण्यात आला आहे. पुणे, औरंगाबाद व आग्रा अशा तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता हिंगणवेढे गावाजवळून जातो. लाखलगावकडून येताना हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच या मार्गावर ९० अंशांचे वळण आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूने असलेले गतिरोधक नादुरु स्त झाले आहेत. तसेच संरक्षक कथड्याचे लोखंडी पाइपही तुटलेले आहेत. रिफ्लेक्टर्स व दिशादर्शक फलकही नाही. त्यामुळे रात्री-बेरात्री वाहनचालकांची दिशाभूल होऊन वाहने सरळ संरक्षक कथड्यावर आदळून अपघात होतात. या रस्त्याच्या लगतच नागरी वसाहत आहे. अनेकदा वळणाचा अंदाज न आल्याने वेगाने येणारी वाहने सरळ हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वारातून गावात शिरतात. रस्त्यालगत लावलेले लोखंडी कथडेही वारंवार होणाºया अपघातांमुळे तुटून पडले आहेत.



रस्त्यालगतच्या घरांनाही अनेकदा नुकसान पोहोचले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हा रस्ता येत असल्याने त्याची डागडुजी होऊन दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत व तुटलेले कठडेही दुरु स्त करावेत. हे काम तातडीने झाले नाही तर आंदोलन करून रास्ता रोको करावा लागेल, असा इशारा हिंगणवेढेचे उपसरपंच वाल्मीक धात्रक, विक्र म राजाराम धात्रक यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे
--------
हिंगणवेढे गावाजवळून रिंगरोड जातो. वळणाचा रस्ता असल्याने वेगाने येणारी वाहने नियंत्रित झाली नाही तर सरळ गावात शिरतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत.
- साहेबराव धात्रक, रहिवासी
-------------
गावाजवळून गेलेल्या महामार्गावर गावाजवळच मोठे वळण आहे. त्याच्या दोन्ही बाजूंचे गतिरोधक खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने संरक्षक कठड्यावर धडकून अपघात होतात. त्यामुळे संरक्षक कठडेही तुटले आहेत.
- गंगाधर धात्रक, रहिवासी

Web Title: Frequent accidents on dangerous turns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक