वारंवार विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:29 PM2020-06-19T23:29:11+5:302020-06-20T00:30:22+5:30

विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.

Frequent power outages | वारंवार विद्युत पुरवठा खंडित

वारंवार विद्युत पुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देनागरिक त्रस्त : देवळाली कॅम्प भागात दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब

देवळाली कॅम्प : विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.
देवळाली कॅम्प परिसरात कुठेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली किंवा पाऊस पडणार असे वातावरण झाले तरी देवळाली कॅम्प परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला होता. लॅमरोड परिसरात वारंवार वीज गायब होत असल्याने
नागरिक वैतागले आहेत. लॉकडाऊन काळात व सद्यस्थितीत नागरि भागात कुठेही विद्युत पुरवठा खंडित करू नये, असा आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश आहेत. तरीही देवळाली कॅम्प मात्र किती काळ विद्युत पुरवठा सुरळीत राहतो, याची नोंद विद्युत मंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा भूमिगत करण्याची मागणी होत आहे. कारण कुठे झाड पडले की, केबल तुटून शॉर्टसर्किट होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे, असेच प्रकार सर्रासपणे घडत असतात. यातून एखाद्या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवळाली कॅम्प परिसरात विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, वारंवारपणे विद्युत पुरवठा खंडित होत राहिला तर अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना याबाबत घेराव घालत जाब विचार असल्याचे माजी आमदार योगेश घोलप, साहेबराव चौधरी, पोपट जाधव, तानाजी भोर, संजय गोडसे, वैभव पाळदे, रोहित कासार, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे आदी सांगितले.
जेलरोड भागात तीन तास वीज नाही
नाशिकरोड,
जेलरोड शिवाजीनगर येथील समाजमंदिराजवळील विजेच्या फिडरवर झाडाची मोठी फांदी पडल्याने जेलरोड भागातील वीजपुरवठा
तीन तास खंडित झाला. यात फिडरचे मोठे नुकसान झाले आहे.
जेलरोड शिवाजीनगर समाजमंदिराजवळील महावितरणच्या फिडरवर दुपारी झाडाची मोठी फांदी पडल्याने जेलरोड भागातील वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला होता. दुपारी ३ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीन तासांनंतर सुरळीत सुरू झाला. मात्र यामुळे व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला.
गेल्या तीन दिवसांपासून वीज प्रवाह सातत्याने खंडित होत आहे. त्यातच पुन्हा आज तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले होते. झाडाची फांदी पडल्याने फिडरचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महापालिका आणि महावितरणच्या कर्मचाºयांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत फांदी हटविल्यानंतर वीज प्रवाह सुरळीत सुरू झाला.

Web Title: Frequent power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.