सायंकाळचा वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:40 PM2020-05-15T21:40:12+5:302020-05-15T23:33:46+5:30
ब्राह्मणगाव : येथील गावाला सायंकाळी होणारा सिंगल फेज वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने गावाला होणारा सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्राह्मणगाव : येथील गावाला सायंकाळी होणारा सिंगल फेज वीजपुरवठा तीन-चार दिवसांपासून सारखा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने गावाला होणारा सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्राह्मणगाव शेतशिवारात सटाणा, अजमीर सौंदाणे, महालपाटणे व लखमापूर या चार उपकेंद्रांतून शेतपरिसरातील शेतीपंपासाठी तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असा थ्रीफेज पुरवठा दिला जातो. सदर वेळापत्रक सटाणा विभागाचे असून, काही उपकेंद्रांचा शेतीपंपासाठी दिला जाणारा थ्रीफेज सप्लाय वेळेत व वार वेगळा आहे.
ब्राह्मणगावच्या शेतशिवाराचा परिसर मोठा असून, अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतशिवारात वास्तव्यास आहेत. काही कुटुंबांनी आपल्या घरासाठी घरगुती वीज मीटर जोडले असून, शेतशिवारात काही ठिकाणी सिंगलफेज वीजपुरवठा कार्यान्वित आहे, तर काही परिसरात शेतकरी सिंगलफेज वीजपुरवठ्यापासून वंचित आहेत, उत्तर दिशेकडील शेतशिवार परिसरात डोंगराळ भाग असून, रात्री सिंगलफेज वीजपुरवठा नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे, वेळोवेळी याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी सिंगल फेज वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.
---------------------------
यावेळेत शेतीपंपाला दिला जाणारा थ्रीफेज सप्लाय गेल्यानंतर सायंकाळी बºयाच ठिकाणी शेत परिसरात सिंगल फेज नाही. त्यामुळे शेतपरिसरातील नागरिक सिंगल फेज करून घेत असल्याने गावाला दिला जाणारा सायंकाळचा सिंगल फेज सप्लाय सारखा खंडित होत असतो, तर काही वेळात परत वीजपुरवठा सुरू झाल्यावर उच्च दाबाचा किंवा कमी दाबाचा वीजपुरवठा सुरू होताच घरगुती उपकरणांमधील तांत्रिक बिघाड तसेच जळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अगोदरच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना त्यात वीजपुरवठा सारखा खंडित होणे तर घरगुती उपकरणे जळणे तसेच उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन दुरुस्तीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसत आहे.
-----------------------------
काही शेतशिवारात सायंकाळचा सिंगलफेज वीजपुरवठा नसल्यामुळे काही शेतकरी सिंगलफेज करून घेत जास्त व्होल्टेजच्या उपकरणांचा वापर करीत आहेत. त्यामुळे गावाला दिला जाणारा सायंकाळचा सिंगल फेज वीजपुरवठा खंडित होत आहे. शेतशिवारातील नागरिकांनी सिंगलफेज पुरवठा वेळात जास्त व्होल्टेजच्या शेगडी, हिटर आदी उपकरणांचा वापर टाळावा.
- दीपक गांगुर्डे,
कनिष्ठ अभियंता, ब्राह्मणगाव.