पोलिसांच्या वारंवार वाहतूकमार्ग बदलामुळे सीबीएसला वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:00 AM2018-06-07T02:00:50+5:302018-06-07T02:00:50+5:30
नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू करण्यात येणार असल्याने त्यानुसार पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे़ या नियोजनानुसार वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि़ ६) सकाळी १० ते १२ या वेळेत वाहतूक बदलाचा प्रयोग केला़ मात्र, पोलिसांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मार्गातील बदलांमुळे सीबीएस, मेहेर व त्र्यंबकनाका या तिन्ही सिग्नलवर वाहतुकीची कोंडी झाली होती़

शहर वाहतूक पोलिसांनी बुधवारी सकाळी अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याच्या दिशेने जाणारा मार्ग बॅरिकेडिंग लावून बंद केला व पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले, तर सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे जाणाºया मार्गावर प्लॅस्टिक पोल उभारून या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू केली़ वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर हे बदल सुरू केले. वाहनांच्या रांगापोलिसांनी ऐनवेळी केलेले मार्गातील बदल, त्यातच एकेरी मार्गावरून सुरू असलेली दुहेरी वाहतूक बंद, बेशिस्त वाहनचालकांचा आगाऊपणा यामुळे इतर वाहनचालकांचा गोंधळ उडाला़ यामुळे सुमारे दोन तास सीबीएसच्या चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़