श्रावणमासानिमित्त उत्तर भारतियांकडून धार्मिक कार्यक्रमांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:27 PM2018-08-06T16:27:18+5:302018-08-06T16:28:32+5:30

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व

Fresh emphasis on religious programs from North Indians on the occasion of Shravanamasam | श्रावणमासानिमित्त उत्तर भारतियांकडून धार्मिक कार्यक्रमांवर भर

श्रावणमासानिमित्त उत्तर भारतियांकडून धार्मिक कार्यक्रमांवर भर

Next
ठळक मुद्देश्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व

नाशिक-उत्तर भारतियांचा श्रावण मास सुरु झाला असून शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तरभारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे.
श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या आराधनेला मोठे महत्व आहे. बिहारमधील बाबा वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणे याला सर्वाधिक महत्व आहे पण ज्यांना नोकरी, व्यवसायामुळे तेथे जाणे शक्य नाही ते भाविक त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर, सोमेश्वर आदि ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यावर, लघुरुद्र, महारुद्र, अभिषेक आदि विधी करुन घेण्यावर भर देत आहेत. गोदाघाट, कुशावर्त, सोमेश्वर आदि ठिंकाणी गंगास्रान, गंगापूजन, दिपदानही आवर्जुन केले जात आहे. उत्तर भारतीय बांधवांकडून श्रावणमास सुरु होताच दर सोमवारी उपवास, महादेवाचे दर्शन, दानधर्म आदि गोष्टी आवर्जुन केल्या जात आहेत. पुरोहितांकडून पुजा अर्चाही करुन घेतली जात आहे. या महिन्यात सोळा सोमवार व्रताला प्रारंभही केला जातो. महाराष्टÑात श्रावण महिना रविवारपासून (दि.१२) सुरु होत आहे.

Web Title: Fresh emphasis on religious programs from North Indians on the occasion of Shravanamasam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.