मित्रानेच केली २० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:08+5:302020-12-26T04:12:08+5:30
नाशिक : नातेवाईकांकडून उसनवार घेतलेले पैसे परत करण्यासाठी गुजरातमधील सुरत येथील कौशिक अशोक दसवाणी यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा ...
नाशिक : नातेवाईकांकडून उसनवार घेतलेले पैसे परत करण्यासाठी गुजरातमधील सुरत येथील कौशिक अशोक दसवाणी यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा असलेली रक्कम मित्राच्या दोन वेगवेगळ्या खात्यावर जमा केली; मात्र मित्रानेच या रकमेचा अपहार करून त्यांची तब्बल वीस लाखांची फसवणूक केल्याची घटना ४ व ५ डिसेंबर या दोन दिवसात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक अशोक दसवाणी यांनी २० लाख रुपये त्यांच्या नातेवाईकांकडून हातउसने घेेतले होते. ते परत करण्यासाठी दसवाणी यांनी त्याचा मित्र मोसीन खान पठाण (३२) यांच्या नाशिकमधील दोन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख असे एकूण २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले; मात्र मोसीनने ही रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरत दसवाणी यांना खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कौशिक दसवाणी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोसीन पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.