मित्रांनीच केला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 12:10 AM2016-06-24T00:10:56+5:302016-06-24T00:30:12+5:30
सुरगाणा : सहा संशयितांना अटक
सुरगाणा : वणी-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडा शिवारात मोठी घोडी येथील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. या युवकाचा त्यांच्याच मित्रांनी घात केल्याचे तपासात उघड झाले आहे़
कळवण प्रकल्प चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयराम मोरे यांचा मुलगा कल्पेश स्कॉर्पिओ (क्र . एमएच ०४ एएफ ०१६८) घेऊन घरा बाहेर पडला. तो न परतल्याने त्याचा तपास सुरू होता. मात्र काही वेळानंतर त्याचा अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अंगावरील टी-शर्टवर ओम बजरंगबली उदयपूर, ता. सुरगाणा या नावावरून सदरचा मृतदेह मोठी घोडी येथील येथील कल्पेश मोरे या तरुणाचा असल्याचे सिद्ध झाले.
जमिनीच्या वादातून आपल्या मुलाचा घातपात घडवून आणल्याची फिर्याद मृताच्या वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने या प्रकरणातील सहा संशयितांना ७२ तासात शिताफिने अटक केली. त्यात गंगाराम उर्फ गंग्या शांताराम बागुल, विश्वास विठ्ठल थोरात, वसंत जयंवत कडाळे, प्रभाकर पवार, अशोक रघुनाथ देशमुख, गणेश प्रभाकर चौधरी यांचा समावेश आहे़ (वार्ताहर)