दोस्तो! सुना क्या, सावरकर नगरमे फिरसे बाघ आया था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:14 AM2019-02-21T01:14:04+5:302019-02-21T01:14:32+5:30
‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’ ‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तोडायची नाही याची मुलांना शपथच देते...
नाशिक : ‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’
‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तोडायची नाही याची मुलांना शपथच देते... एखाद्या व्हिडीओत नाही तर ही सारी पात्रे महापालिकेच्या पुष्पोत्सवानिमित्त लहानग्यांची जिवाभावाची पात्रे भेटून संदेश देणार आहेत.
महापालिकेच्या वतीने येत्या शुक्रवार (दि.२३) पासून पुष्पोत्सव सुरू होत असून, सध्या त्याची जय्यत तयारी महापालिकेत सुरू आहे. राजीव गांधी भवनचे प्रवेशद्वार सुशोभित करण्यात आले असून, सुरुवातीला हिरवळीवर नर्सरीचे स्टॉल्स आहेत. परंतु राजीव गांधी भवनात केवळ पुष्पोत्सवाचा दरवळ असणार आहे. पुष्पमहोत्सव आणि पुष्प स्पर्धा विविध गटात असल्याने राजीव गांधी भवनच्या तिन्ही मजल्यांवर सध्या टेबल टाकणे आणि अन्य कामांची धावपळ सुरू आहे. भवनच्या एका बाजूने खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील असणार आहेत. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेत छोट्या भीमची टीम दाखल झाली आहे. जाडू कालिया, माकड जग्गू, ढोलू-मोलू, किडकिडीत छुटकी आणि टकलू राजू अशी वेगळ्या चेहऱ्यांची आणि पेहरावाची पात्रे म्हणजे बच्चे कंपनीचे सवंगडीच. नाशिक शहरातील सावरकरनगरमध्ये दोन वेळा बिबट्या येऊन गेला. तो का आला तर शहराभोवतीची झाडे तोडल्याने जंगल कमी झाले आणि त्यामुळे त्यांना शहरात यावे लागले. या ताज्या प्रसंगावर छोटा भीमची टीम संवादात्मक रूपाने पर्यावरणाचे महत्त्व पटविणार असून त्यांचे स्टॅच्यू दाखल झाले आहेत.