अखेरच्या श्वासापर्यंत निभावली मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:51 AM2018-08-06T00:51:58+5:302018-08-06T00:55:55+5:30
नाशिक : वाड्याच्या मागील बाजूने असलेल्या भींतीची माती ढासळू लागल्याचे काळे कुटुंबियांच्या लक्षात आले. यामुळे संसारपयोगी साहित्य सुरक्षित रित्या हलविण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी समर्थ काळे याचा मित्र करण याने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्या दोघा मित्रांवर मैत्रीदिनीच काळाने झडप घातली. यामुळे संपुर्ण जुने नाशिक हळहळला.

संसारोपयोगी वस्तू हलविण्यासाठी मदत करत असताना वाडा कोसळला आणि दोघेही ढिगाऱ्याखाली दाबले गेले. ते अत्यवस्थ अवस्थेत ढिगाºयाखाली एकमेकांच्या शेजारीच होते. करणने समर्थसोबत केलेली मैत्री अखेरपर्यंत निभावली अशी चर्चा परिसरातील रहिवाशांमध्ये सुरू होती. दोघांनी या जगातून एकाचवेळी दुर्दैवी निरोप घेतल्याने अवघ्या जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघेही राजे छत्रपती कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते होते. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यामध्ये नेहमी दोघेही अग्रेसर असायचे, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. करण हा मंडळाच्या सेक्रेटरी पदावर होता. जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, म्हसरूळटेक परिसराने करण, समर्थच्या रूपाने दोन चांगल्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांना गमावले आहे. करणच्या मृतदेहावर शोकाकू ल वातावरणात अमरधाममध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेने अवघे जुने नाशिककर सुन्न झाले होते. बचावकार्य सुरू असताना बहुतांश रहिवाशांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. काळाने अशा प्रकार दुर्दैवी झडप घातल्याने दोघा मित्रांना आपले प्राण मैत्रीदिनाला गमवावे लागल्याची शोकमग्नभावना व्यक्त झाल्या.