नागपूरहून थेट मुंबईच्या वेशीपर्यंत आता नॉन-स्टॉप, समृद्धीचा तिसरा टप्पा आज होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:42 AM2024-03-04T06:42:23+5:302024-03-04T06:43:04+5:30
भरवीर ते इगतपुरी हा तिसऱ्या टप्प्यातील मार्ग २४.८७२ कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे ७०१ कि.मी. पैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे.
नाशिक : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण होणार असून, मुंबईपर्यंतचा प्रवास आणखी कमी वेळेत होणार आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व एका तासात शिर्डीला पोहोचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.