अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिंडोरीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 07:01 PM2018-08-03T19:01:02+5:302018-08-03T19:01:48+5:30

 Front of Aanganwadi employees' Dindori | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिंडोरीत मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिंडोरीत मोर्चा

Next

दिंडोरी , वरखेडा : येथे अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी एस टी बस्थानक ते पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर संघाचे सचिव राजेश सिंह,भगवान दौने, तालुका अध्यक्षा पद्मा भुजबळ,यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, या वेळी दुपारी दोन वाजेपासून पाच तास ठीय्या आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी आर एन बनकर यांना देण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाºयांना कायम कर्मचाºयाचा दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचाºयांचे वेतन व भत्ते त्वरीत लागू करावे, त्यांना साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे, लाभार्थींच्या पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवून द्यावी,यासह विविध मागण्या घेऊन अनेक वेळा कर्मचारी आंदोलने करतात मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे , सरकारने अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न त्वरीत सोडवावे अन्यथा याही पेक्षा मोठ्याप्रमाणात मोर्चा काढला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव राजेश सिंह यांनी यावेळी बोलताना दिला. दिंडोरी येथे अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी एस टी बस्थानक ते पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर संघाचे सचिव राजेश सिंह,भगवान दौने, तालुका अध्यक्षा पद्मा भुजबळ,यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, या वेळी दुपारी दोन वाजेपासून पाच तास ठीय्या आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी आर एन बनकर यांना देण्यात आले. संख्या असलेले अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा आदेश रद्द करणे , लाईन लिस्टिंगच्या कामाची सक्ती बंद करणे, अमृत आहार योजनेचे दिलेले कंत्राट रद्द करणे, १० तास काम करण्याची सक्ती करू नये, व साप्ताहिक सुट्टी देणे, मागील वर्षाच्या भाऊबीज देयकाचे त्वरीत वाटप करणे,आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुसुम गायकवाड ,गंगावती वाघ , लीलावती पगारे, अलका विसपुते,नंदा गांगुर्डे,कल्पना वाघ, मनीषा देशमुख, कुसुमबाई अस्वले, आदींसह चारशे महिला उपस्थित होत्या.

Web Title:  Front of Aanganwadi employees' Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा