महागाईविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:08 AM2017-09-26T00:08:32+5:302017-09-26T00:08:39+5:30
महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करणाºया शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
मालेगाव : महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी
देण्यास टाळाटाळ करणाºया शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. चारशे रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ६०१ रुपयांना मिळत आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत. सणा-सुदीला रेशन उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकºयांना कर्जमुक्ती दिली जात नाही. नोटाबंदीमुळे व्यवहार रखडले आहेत याच्या निषेधार्थ केंद्रात व राज्यातील भाजपाच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्वर, मोसमपूलमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आणण्यात आला. रस्त्यावरच शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी चूल मांडून स्वयंपाक केला. यावेळी प्रमोद शुक्ला, बंडू बच्छाव यांनी भाषणे केली. मोर्चात संजय दुसाने, रामा मिस्तरी, सुनील देवरे, विनोद वाघ, नगरसेवक ज्योती भोसले, जिजा बच्छाव, छाया शेवाळे, नीलेश आहेर, सुनील चांगरे, चंदू पठाडे, राजाराम जाधव, संगीता चव्हाण, भिकन शेळके, राजेंद्र पाटील आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.