अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:16 AM2018-08-22T00:16:40+5:302018-08-22T00:17:14+5:30
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
नाशिकरोड : महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी के. जे. मेहता हायस्कूलपासून भर पावसात बिटको चौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होता. विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाºयांना कायम कर्मचाºयांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांचे वेतन, भत्ते लागू करण्यात यावे, सेवा समाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाºयांना १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आर्थिक अंदाजपत्रक वाढविण्यात यावे, रिक्त जागांवर सेविका, मदतनीस व मुख्य सेविकाची नियुक्ती करण्यात यावी, लाभार्थींच्या आहाराच्या पैशांमध्ये वाढ करण्यात यावी, कोणतीही अंगणवाडी केंद्र लाभार्थी नाहीत या नावाने बंद करण्यात येऊ नये, अंगणवाडीला शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समावेशन करण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात यावा, जुलै महिन्याचे थकीत मानधन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. मोर्चामध्ये अंगणवाडी संघाचे कार्याध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस वृजपाल सिंह, राजू लोखंडे, प्रल्हाद देशमाने, राजश्री पानसरे, रजनी कुलकर्णी, जिजाताई अहेरराव, नलिनी कसोटे, कमल पाटील, अनुसया वाघ, संजीवनी वाघमारे, सुलोचना ठोंबरे, कल्पना पाटील, पद्मा भुजबळ आदिंसह शेकडो अंगणवाडी सेविका व कर्मचारी सहभागी झाले होते.
भर पावसात मोर्चा
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी पाऊस सुरू असतांना देखील के. जे. मेहता शाळेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चामध्ये महिला एका रांगेने सहभागी झाल्या होत्या.