विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सटाण्यात लवकरच हवाई पादचारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:16 AM2018-02-11T00:16:45+5:302018-02-11T00:18:16+5:30
सटाणा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील ताहाराबाद नाक्यावर हवाई पादचारी मार्गाच्या कामास नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सटाणा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील ताहाराबाद नाक्यावर हवाई पादचारी मार्गाच्या कामास नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रि या राबवून कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकासच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली होती. यावेळी मोरे यांनी शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे विद्यार्थी व नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे लहान-मोठे अपघात होऊन जीव गमवावा लागतो. साक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील ताहाराबाद नाक्यावर हा हवाई पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या परिसरात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, दवाखाने असल्यामुळे दिवसातून चार ते पाच हजार विद्यार्थी व नागरिक हा रस्ता ओलांडतात. या कामामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.