आघाडी-बिघाडी, घडलंय-बिघडलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:24 AM2019-10-07T00:24:23+5:302019-10-07T00:25:31+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रचाराने जोर धरला असून, उमेदवार आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच आघाडी- बिघाडी, घडलंय-बिघडलंय, अहं भ्रष्टाचारामी असे अनेक पक्ष समर्थक विरोधकांचे पेजेसवर विरोधी माहिती दिली जात आहे. त्यात केवळ विरोधी मुद्देच नाही तर सकारात्मक बाजू आणि व्यंगचित्रे, टीकाटिप्पणी देखील केली जात असल्याने प्रबोधनाबरोबरच मनोरंजनदेखील होत आहे.

Front-to-side, happened-to-break ... | आघाडी-बिघाडी, घडलंय-बिघडलंय...

आघाडी-बिघाडी, घडलंय-बिघडलंय...

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर धम्माल : प्रचारासाठी अफलातून फेसबुक पेजेस

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रचाराने जोर धरला असून, उमेदवार आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच आघाडी- बिघाडी, घडलंय-बिघडलंय, अहं भ्रष्टाचारामी असे अनेक पक्ष समर्थक विरोधकांचे पेजेसवर विरोधी माहिती दिली जात आहे. त्यात केवळ विरोधी मुद्देच नाही तर सकारात्मक बाजू आणि व्यंगचित्रे, टीकाटिप्पणी देखील केली जात असल्याने प्रबोधनाबरोबरच मनोरंजनदेखील होत आहे.
सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून पारंपरिक प्रचार साधनेच्या तुलनेत अन्य प्रचार वाढत आहेत. कोणतीही निवडणूक असो नसो नेत्यांच्या नावांचे ग्रुप आणि फॅन्स क्लब हे केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरच नव्हे तर फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवरदेखील उपलब्ध आहेत. त्या पानांसाठी लाइक्स भरपूर मिळतात. तसेच टीकाटिप्पणीदेखील होत असते. लोकसभा निवडणुकीत अनेक फेसबुक पेजेस तयार झाले होते, परंतु आता विधानसभेसाठी हजारो इच्छुक असल्याने त्यातील बहुतांशी इच्छुकांनी सोशल मीडियावर आपले अकाउंट केले आहेत, तर काहींनी पेजेस केले आहे. फक्त भाऊच आमदार, ताईसाहेब किंवा मतदार संघनिहाय किंवा अन्य उमेदवार आणि पक्षाच्या नावाने अधिकृत नमूद करून अनेक पेजेस तयार करण्यात आले आहेत.
डिस्ट्रॉय फरक, शिवसेना परत असेदेखील एक समर्थकांचे पेज आहे. या पेजेसवरील मजकुरापेक्षा त्यातील कॉमेंट्सदेखील लक्षवेधी असतात. काही वेळा खिल्ली उडविली जाते. तर काही वेळा कॉमेंट्स टाकणाऱ्यांमध्ये वाद-विवाद टीकाटिप्पणीदेखील केली जाते. अर्थात, फेसबुकवर अनेक प्रकारची माहिती किंवा तयार करणारा वगैरे फेक असू शकतात. त्यामुळे वृत्तपत्रातील माहितीच अधिक विश्वासार्ह असते, असे यासंदर्भात वाचकांचे म्हणणे आहे. फेसबुकवरील माहिती केवळ मनोरंजक ठरते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. व्यक्तिगत पेजेस पलीकडे राजकीय पक्ष समर्थक आणि विरोधकांनीदेखील पेजेस तयार केले असून, सध्या निवडणुकीत त्याचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. आघाडी-बिघाडी हे आघाडीच्या विरोधातील पेज दिसत आहे, तर ‘अहं भ्रष्टाचारामी’तदेखील आघाडीच्या विरोधातील प्रकरणे आहेत. ‘फक्त देवेंद्र’ हे मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाचे जसे पेज आहे तसेच ‘कॉँग्रेस बरी होती राव’ असेदेखील पेज आहे.

Web Title: Front-to-side, happened-to-break ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.