आदिवासी बांधवांचा सटाण्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:56 PM2018-11-05T16:56:18+5:302018-11-05T16:56:49+5:30
सटाणा:शहरातील देवळा रोडवरील तुर्किहुंडीजवळील उमाजी नगर येथील आदिवासी बांधवांचा रस्ता बंद होणार असल्याने तसेच आदिवासीची जमीन बळकावल्याने संतप्त झालेल्या संतप्त आदिवासींनी आज सोमवारी (दि.५) शहरातून बोगस आदिवासी हटावच्या घोषणा देत आदिवासी बांधवांचा सटाण्यात मोर्चा काढला.

मोर्चात देवळ्याचे माजी सरपंच रघु नवरे,यंग भिल्ल संघटनेचे विकी सोनवणे,कृष्णा वाघ,व्ही.के.सोनवणे,प्रदीप गांगुर्डे,विष्णू गांगुर्डे,मीराबाई माळी,यमुनाबाई सोनवणे,अनिता सोनवणे,सिंधुबाई सोनवणे, तारा पवार,सुनंदा कजबे,रेश्मा चव्हाण,शरद शिंदे,मनिराम बागुल,नाना बागुल, धर्मा सोनजे,दगा पवार,गणेश ठाकरे,भास्कर पवार दादाजी तलवारे,शांताराम वाघ,सागर पवार,बुधा शिंदे,भगवान सावंत,केशव सावंत आदींसह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन:सटाणा येथील उमाजीनगरच्या आदिवासींची बळकावलेली जमीन परत मिळावी व जमिनीची बिगर खरेदी केल्याने संतप्त आदिवासींनी बोगस आदिवासी हटाव मोर्चा तहसील कार्यालयावर नेला.या मोर्चात सहभागी आदिवासी बांधव व महिला