ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शनसह विविध मागण्यांसाठी मोर्चा
By admin | Published: May 30, 2017 12:31 AM2017-05-30T00:31:10+5:302017-05-30T00:31:21+5:30
ज्येष्ठ नागरिकांनी शिंदे मंडल अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निवडणूक जाहिरनाम्यात साठ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्याचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागणीकरिता ज्येष्ठ नागरिकांनी शिंदे मंडल अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावे या मागणीकरिता सोमवारी दुपारी शिंदे गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी शिवाजी पुतळ्यापासून भाजी मंडई, नायगाव रोडमार्गे शिंदे मंडल अधिकारी-ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मोर्चाच्या अग्रभागी ताशा वादक सामील झाले होते. मोर्चामध्ये बाजार समिती संचालक संजय तुंगार, दशरथ जाधव, निवृत्ती जाधव, शंकर बोराडे, निखिल झाडे, सोसायटी अध्यक्ष विष्णु मते, तानाजी जाधव, अशोक बोराडे, शंकर जाधव, पुंडलिक आव्हाड, अकील मनियार, रामदास भिसे, शकुंतला मोरे, लतिफ मनियार, काशीनाथ काकड, मंदाबाई पोरजे, हिराबाई जाधव, बबाबाई शेलार, ताईबाई काकड, खंडेराव झाडे, पारूबाई काळे आदिंसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.