रिपाइंचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:55 AM2018-03-29T00:55:55+5:302018-03-29T00:55:55+5:30
अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
नाशिकरोड : अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बुधवारी दुपारी रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होता. महसूल उपआयुक्त रघुनाथ गावंडे यांना शिष्टमं डळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात झालेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, झोपडपट्टीधारक जेथे राहतात तेथे घरकुल योजना राबवून सातबाराच्या उताऱ्यावर झोपडपट्टीवासीयांची नावे लावण्यात यावी, भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मनोहर भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी, ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक सुनील वाघ, संजय भालेराव, पवन क्षीरसागर, दिलीप दासवाणी, सुनील कांबळे, विलास पवार, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, नारायण गायकवाड, आकाश भालेराव, दिलीप आहिरे, दीक्षा लोंढे, प्रभा धिवरे आदींच्या सह्या आहेत.
गुन्हे मागे घेण्यात यावे
शासकीय वनजमिनी, गायरान जमिनी कसणाºया व तेथे राहणाºयांची नावे सातबारावर लावण्यात यावी, रेल्वे भरतीसंदर्भात आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, शेतकºयांना कर्जमुक्त करून सातबारा उतारा कोरा करण्यात येऊन शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, बेरोजगार व भूमिपुत्रांना नोकरभरतीत प्राधान्य देऊन व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.