सटाण्यात राष्टवादीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:01 AM2018-10-28T01:01:17+5:302018-10-28T01:01:47+5:30
बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.
सटाणा : बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बागलाण तहसील कार्यलयावर शनिवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात आला.
बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार , संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात केंद्र व राज्यातील भाजप शासनाविरु द्ध घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा तहसील आवारात येताच सभेत रु पांतर झाले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार यांनी भाजप सरकार वर टीका केली. सत्तेत आल्यापासून भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. जिल्ह्यासह राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भाजपा सरकार जनतेची चेष्टा करीत आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पालकत्व निभावता येत नाही. याकरिता पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा असे मत पगार यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात गपूर मलिक शेख, राजेंद्र सोनवणे, यतिन पगार, खेमराज कोर, अधिक सावंत, संजय पवार, विजय वाघ, गटनेते काकाजी सोनवणे, जिभाऊ सोनवणे, डॉ. विठ्ठल येवलकर, रत्नाकर सोनवणे आदी सहभागी झाले होते.