विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:03 PM2018-01-19T18:03:01+5:302018-01-19T18:05:40+5:30
सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मुंबई नाका, गडकरी चौक,
नाशिक : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा रस्त्यावर उतरण्यात येईल असा इशाराही यावेळी मोर्चेक-यांच्या वतीने देण्यात आला.
सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मुंबई नाका, गडकरी चौक, जुना त्र्यंबक नाका, मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी हा निर्णय घातक आहे. त्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणे परवडणारे नाही त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. मागासवर्गीय व ओबीसी गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळालेली नसून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची पोर्टल साईटही वारंवार बंद पडत आहे. शहरातील बस फे-या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास त्रास होत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी तसेच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी शासनाने निधी द्यावा, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावे, मुलींसाठी सॅनटरी नॅपकीन वेडींग मशीन बसविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शनही केले. मोर्चात विद्यार्थी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष गोवर्धन गोवर्धने, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, विद्यासागर घुगे, दत्ता कुटे, सागर ठाकरे, सुरज सरोवर, रमीझ पठाण, तुषार जाधव, अक्षय कहांडळ, चेतन देशमुख, यशराज गोवर्धने, श्रीपाद सुर्यवंशी, प्रतिक अहेर यांच्यासह शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.