विल्होळीत स्वच्छता अभियान फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:03 PM2018-09-26T23:03:28+5:302018-09-27T00:13:21+5:30
येथे ग्रामस्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात आले असून नागरिक, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत टाकावा, असे सांगण्यात आले.
विल्होळी : येथे ग्रामस्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात आले असून नागरिक, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत टाकावा, असे सांगण्यात आले. या फेरीसाठी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भावनाथ, ताराबाई वाघ, संपत बोंबले, संजय गायकवाड, नवनाथ गाडेकर, संतोष आल्हाट, जानकाबाई चव्हाण, रेवूबाई आचारी, मोतीराम भावनाथ, मनोहर भावनाथ, मुख्याध्यापक रवींद्र भदाण आदी उपस्थित होते.
आॅनलाइन अभिप्राय
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत असून, ग्रामस्थांकडून आॅनलाइन अभिप्राय घेण्यात येत आहे. ग्रामस्थांची अभिप्राय नोंदणी सुरू झाली असून, त्यावर जिल्ह्याचे गुणांकन ठरणार असल्याने ग्रामस्वच्छता फेरीचे आयोजन करून फेरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळा विल्होळीच्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. स्वच्छ गाव-सुंदर गाव, स्वच्छ विल्होळी-सुंदर विल्होळी, गावाचा सन्मान वाढवू या, अशा अनेक प्रकारच्या घोषणा फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्या.