इगतपुरीत संत्रा बागांवर फळगळतीचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:01 AM2020-09-07T00:01:03+5:302020-09-07T00:25:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, साकूर, घोटी खुर्द परिसरात शेतात संत्रा बागा आहेत. संत्रा उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अज्ञात रोगामुळे संत्रा फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.

Fruit crisis on orange orchards in Igatpuri! | इगतपुरीत संत्रा बागांवर फळगळतीचे संकट !

इगतपुरीत संत्रा बागांवर फळगळतीचे संकट !

Next
ठळक मुद्दे कृषी विभागाचे दुर्लक्ष : पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, साकूर, घोटी खुर्द परिसरात शेतात संत्रा बागा आहेत. संत्रा उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अज्ञात रोगामुळे संत्रा फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फळ गळती वाढली असून, काही बागांमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत फळगळती झाल्याने व उर्वरित फळांना डाग आल्याने शेतकºयांपुढे संकट उभे ठाकले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळाचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र कोरोनामुळे बाजारपेठ अनेक दिवस बंद असल्याने आधीच नुकसान सहन करत असलेले शेतकरी आता अज्ञात रोगामुळे त्रस्त झाले आहे. फळ गळतीमुळे कोट्यवधीचे नुकसानगेल्या सहा सात दिवसात दररोज मोठ्या प्रमाणावर फळ गळती होत असून, अनेक बागा फळविरहित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या संत्राला गळती लागली व फळ गळाल्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे ही फळ गळती कोणत्या रोगामुळे होत आहे, ती का होत आहे याबद्दल शेतकºयांना कोणतीच माहिती नाही. दुर्दैव म्हणजे अद्यापपर्यंत कृषी विभागाने ही त्याकडे लक्ष घातलेले नाही.
या रोगाची व त्याच्या परिणामांची माहिती कृषी विभागाला सांगितल्यानंतर कृषी विभागाने या भागातील बागांची पाहणी करून आर्थिक मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठवू असे म्हटले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

Web Title: Fruit crisis on orange orchards in Igatpuri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.