ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात फळवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:41+5:302021-02-20T04:40:41+5:30

नाशिक : शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने शुक्रवारी (दि. १९) नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मिरवणूक, पोस्टर खर्च यासह इतर खर्चांना फाटा देत ...

Fruit distribution to the old age home by the Transport Association | ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात फळवाटप

ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात फळवाटप

Next

नाशिक : शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने शुक्रवारी (दि. १९) नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून मिरवणूक, पोस्टर खर्च यासह इतर खर्चांना फाटा देत सामनगाव येथील वृद्धाश्रमात फळवाटप तसेच गोशाळेत चाऱ्याचे वाटप करत अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, पदाधिकारी महावीर मित्तल, शंकर धनावडे, संजय राठी, दीपक ढिकले, सतीश कलंत्री, किरण आव्हाड, सुलेमान सय्यद, सिद्धेश्वर साळुंखे, अमर नागरे, विनोद चौधरी, सोनू शर्मा, प्रवीण पाटील, अरविंद पाटील, जे. पी. इंडोरिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढणे किंवा पोस्टर लावणे यासह अवास्तव खर्च न करता, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी जे केले, त्याचे स्मरण करून समाजातील गोरगरीब व वंचित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने सामनगाव येथील वृद्धाश्रमात व अपंगांना फळवाटप करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी सांगितले.

===Photopath===

190221\19nsk_19_19022021_13.jpg

===Caption===

शिवजयंतीनिमित्त नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे फळांचे वाटप

Web Title: Fruit distribution to the old age home by the Transport Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.