फळभाज्या कडाडल्या; आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:54 AM2019-04-24T00:54:37+5:302019-04-24T00:55:01+5:30
उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले
पंचवटी : उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, उन्हाळ्यात सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात विक्रीसाठी आलेल्या दोडका जाळीला ८०० रु पये दर मिळाला असून, कारली ६०० रु पये जाळी दराने विक्र ी झाली.
सर्वसामान्य ग्राहकांना एक किलो दोडका खरेदीसाठी ८० तर कारलीसाठी ६० रु पये प्रतिकिलो दराने पैसे मोजावे लागत आहे. बाजार समितीत काही प्रमाणात ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी, दोडका, भोपळा असा शेतमाल विक्र ीसाठी दाखल होत आहे. आगामी काळात शेतातील पिकांना पाणी कमी पडले तर सर्व शेतमालाची आवक घटून बाजारभाव अजून तेजीत येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून शेतमालाची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने आवक घटली आहे. बाजार समितीत भोपळा प्रतिनग १५ रु पये, काकडी २५ रु पये किलो, वांगी २५ रु पये, ढोबळी मिरची ३० रु पये किलो तर कारली ६० आणि दोडका ८० रु पये किलो दराने विक्र ी झाला.