फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:12 AM2017-07-22T00:12:14+5:302017-07-22T00:12:29+5:30

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

Fruit prices fall; Increased inward | फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. साधारणपणे ३५ ते ४० टक्के बाजारभाव घसरलेले आहेत.  बाजार समितीत कारली, भोपळा, वांगी, भेंडी, दोडका, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची आवक होत आहे. पावसामुळे फळभाज्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने उत्पादन वाढले आहे. शनिवारी बाजार समिती बंद असल्याने सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत फळभाज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी घेऊन आले होते. नाशिकसह मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने अन्य बाजारपेठेत पावसामुळे शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरलेले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कारली १२ किलो जाळीला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कारली ५०० रुपये जाळी दराने विक्री झाली होती. कारली पाठोपाठ भोपळा १८ नग १७० रुपये, शिमला मिरची ३०० रुपये जाळी म्हणजे २५ रुपये प्रती किलो दराने विक्र ी झाली, तर वांगी २५० रुपये (२० रुपये किलो) असा बाजारभाव मिळाला. पाऊस सुरू झाल्याने अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने तसेच फळभाज्यांची काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावात काहीसी घसरण झाली आहे. टमाटा मालाची आवक कमीच असल्याने बाजारभाव टिकून आहेत.  दरम्यान, सिडको, इंदिरानगर, सातपूर भागातील छोट्या भाजीबाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Fruit prices fall; Increased inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.