पहिल्या पतीच्या मदतीनं तिनं दुस-या पतीचा काढला काटा, आरोपी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 09:48 AM2018-03-03T09:48:01+5:302018-03-03T09:48:01+5:30

महिलेनं पहिल्या पतीच्या मदतीनं दुस-या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Fruit Trader Murder case Police arrest 2 Suspected | पहिल्या पतीच्या मदतीनं तिनं दुस-या पतीचा काढला काटा, आरोपी गजाआड 

पहिल्या पतीच्या मदतीनं तिनं दुस-या पतीचा काढला काटा, आरोपी गजाआड 

Next

मालेगाव (नाशिक) - डाळिंब व्यापारी मोहम्मद सज्जाद याच्या हत्या प्रकरणी रमजानपुरा पोलिसांनी पत्नी व तिच्या पहिल्या पतीला अटक केली आहे. फलटण (सातारा) येथून शुक्रवारी (2 मार्च) पहाटे संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांना शुक्रवार रात्री 10 वाजता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील अक्सा कॉलनी भागातील मोहंमदिया टॉवर येथे वास्तव्यास असलेल्या मोहम्मद सज्जाद मोहंमद बशीर (36) यांची 15 फेब्रुवारीला राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. बशीर हे मूळचे पाटणा येथील रहिवासी होते. या घटनेनंतर त्यांची पत्नी नाजीया मोहम्मद सज्जाद ही फरार होती. 

जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व पथकाने गोवा, मुंबई येथे जाऊन अत्यंत गोपनीय माहिती मिळवली. यावेळी चौकशीदरम्यान नाजिया व तिचा पहिला पती आसिफ शेख जमीलनं संगनमताने सज्जादची हत्या केली होती. या प्रकरणानंतर पोलीस या दोघांच्या मागावर होते. गुरुवारी (2 मार्च) रात्री उशिरा फलटणमधून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  

Web Title: Fruit Trader Murder case Police arrest 2 Suspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून