घरकुलाखालून इंधनाची पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 12:06 AM2022-02-20T00:06:40+5:302022-02-20T00:12:19+5:30

मनमाड : शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव, ता. नांदगाव येथील एका शेतकरी असलेल्या आदिवासी कुटुंबाने शासनाने दिलेल्या घरकुलाखालून कुठलीही परवानगी न घेता इंधनाची पाईपलाईन टाकल्याने घरासह कुटुंबाला धोका निर्माण झाला असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत कंपनीच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे विठोबा जिरे यांनी दिला आहे.

Fuel pipeline under the house | घरकुलाखालून इंधनाची पाईपलाईन

घरकुलाखालून इंधनाची पाईपलाईन

Next
ठळक मुद्देअनेकांच्या शेतीमधून ही पाइपलाइन जात आहे.

मनमाड : शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव, ता. नांदगाव येथील एका शेतकरी असलेल्या आदिवासी कुटुंबाने शासनाने दिलेल्या घरकुलाखालून कुठलीही परवानगी न घेता इंधनाची पाईपलाईन टाकल्याने घरासह कुटुंबाला धोका निर्माण झाला असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत कंपनीच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे विठोबा जिरे यांनी दिला आहे.
परिसरातील इंडियन ऑईलच्या या इंधन कंपनीची गुजरात-सोलापूर अशी जमिनीखालून डिझेल, पेट्रोल या इंधन पाईपलाईनचे काम सुरू आहे. अनेकांच्या शेतीमधून ही पाइपलाइन जात आहे. या पाईपलाईनचे काम सुरू असताना परिसरातील अस्तगाव येथील विठोबा जिरे यांच्या घराखालून त्यांची परवानगी न घेताच पाइपलाइन काढल्याने भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या घरकूल योजनेतून पक्क्या बांधलेल्या घराखालून आडव्या आधुनिक मशिनद्वारे बोअर करून पाईपलाईन करण्यात येत आल्याने त्यांचे काम सुरू असताना मशीनच्या व्हाइब्रेटमुळे घराला तडे गेले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित स्तरावर तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार जिरे यांनी केली आहे.

Web Title: Fuel pipeline under the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.