इंधन दरवाढीचा एनएसयूआयतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:01 AM2018-05-30T00:01:48+5:302018-05-30T00:01:48+5:30

जिल्हा एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मोटरसायकल दोरीने बांधून इंधन बचतीचा पर्याय नागरिकांसमोर आणला. भविष्यात महाविद्यालयात जाताना आपापल्या मोटरसायकल्स दोरीला बांधून ढकलत घेऊन जाव्या लागतील म्हणून प्रतिकात्मक निषेध शनिवारी (दि. २६) संघटनेच्या वतीने नोंदविण्यात आला.

 The fuel price hike was denied by the NSUI | इंधन दरवाढीचा एनएसयूआयतर्फे निषेध

इंधन दरवाढीचा एनएसयूआयतर्फे निषेध

googlenewsNext

नाशिक : जिल्हा एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मोटरसायकल दोरीने बांधून इंधन बचतीचा पर्याय नागरिकांसमोर आणला. भविष्यात महाविद्यालयात जाताना आपापल्या मोटरसायकल्स दोरीला बांधून ढकलत घेऊन जाव्या लागतील म्हणून प्रतिकात्मक निषेध शनिवारी (दि. २६) संघटनेच्या वतीने नोंदविण्यात आला.  यावेळी बोलताना माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केंद्र सरकारने केलेली ही दरवाढ म्हणजे त्यांच्याच ‘अच्छे दिन’ संकल्पनेला लावलेला सुरु ंग असल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष राहुल कदम यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही  अत्यंत अन्यायकारक असल्याचे सांगितले. काँग्रेसचे माजीशहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांनीही या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला.  यावेळी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील आव्हाड, प्रदेश एनएसयूआय सरचिटणीस नितीन काकड, न्शिक जिल्हा एनएसयूआय  अध्यक्ष राहुल कदम, चित्रा लोखंडे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष  सचिन भुजबळ, स्वप्नील पाटील, नगरसेविका आशा तडवी, भास्कर गुंजाळ, कुशल लुथरा, राज छाजेड, मुफदल पेंटर आदींसह पदाधिकारींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  The fuel price hike was denied by the NSUI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.