इगतपुरी आगारात इंधन बचत सप्ताहनिमित्त बसचालकांना इंधन बचतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:53 PM2021-01-16T16:53:17+5:302021-01-16T16:55:06+5:30
नांदूरवैद्य : नाशिक जिल्ह्यातील स्थानिक एस टी आगारात शनिवार (दि.१६) पासून इंधन बचत सप्ताह राबविला जात असून या निमित्ताने इगतपुरी येथील आगारात सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात बस चालकांना इंधन बचतीचे महत्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन आगारप्रमुख संदिप पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक योगेश काळे यांनी केले.

इधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने इंधन बचत केले पाहिजे. केवळ एस टी प्रशासनापुरती इंधन बचतीचे कार्यक्रम न घेता राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे असे संदिप पाटील यांनी बस चालकांना इंधन बचतीविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले.
भविष्यात इंधनाची मोठी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे जेवढी बचत करणे शक्य होईल तेवढी इंधनाची बचत करावी. इंधन बचत करणाऱ्या चालकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर नवीन चालकानींही इंधनाची बचत करावी असे कर्मचारी विलास बिन्नर यांनीआपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यानंतर कर्मचारी जुंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चालक व कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कैलास गरूड, राकेश सांगळे, योगेश काळे, इंधन लिपिक बागुल, जेष्ठ चालक सुरेश काळे, चिमा पारधी, यांत्रिक कर्मचारी प्रवीण चौधरी, आकाश काळे, दत्ता भांगरेआदींसह आगारातील चालक वाहक तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
कोट...
इंधन बचत करणे हे प्रामुख्याने चालकाच्या हातात असून चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्यास निश्चितच इंधन बचत होण्यास चालना मिळेल. त्याचप्रमाणे चालकांनी एकमेकांशी समन्वय साधत इंधन बचतीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याने यामुळे एस टी ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
- संदिप पाटील, आगार प्रमुख, इगतपुरी.