दुगावजवळ इंधनाचा टँकर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:11 IST2021-06-13T18:04:12+5:302021-06-13T18:11:00+5:30
चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे इंडियन ऑईल कंपनीचा इंधन भरलेला टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

चांदवड तालुक्यातील दुगावजवळ उलटलेला इंधनाचा टँकर.
चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे इंडियन ऑईल कंपनीचा इंधन भरलेला टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
मनमाड ते चांदवड या रस्त्याचे काम चालू असल्याने सध्या एकाच बाजूने वाहन धारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मनमाड बाजूकडून इंधन भरलेला टँकर (क्रमांक एमएच १६ जीई ५०१३) चांदवडकडून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुगाव येथे पलटी झाला. त्यामुळे टँकरमधील संपूर्ण इंधन खाली पडून वाया गेले. यावेळी नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक पोपट कारवाल, पोलीस कर्मचारी वाळेकर, डोंगरे, होमगार्ड यांनी गर्दी हटवली आणि पलटी झालेला टँकर क्रेनच्या सहाय्याने उभा करण्यात आला.