त्र्यंबकेश्वर मंदिरालगत फुल विक्रे त्याच्या व्यवसायावर गदा मंदिरात फुले नेण्यास बंदी

By Admin | Published: January 7, 2015 01:31 AM2015-01-07T01:31:08+5:302015-01-07T01:32:47+5:30

त्र्यंबकेश्वर मंदिरालगत फुल विक्रे त्याच्या व्यवसायावर गदा मंदिरात फुले नेण्यास बंदी

Fulamkeshwar temple at Trimbakeshwar temple is not allowed to carry floral flowers in the mud temple | त्र्यंबकेश्वर मंदिरालगत फुल विक्रे त्याच्या व्यवसायावर गदा मंदिरात फुले नेण्यास बंदी

त्र्यंबकेश्वर मंदिरालगत फुल विक्रे त्याच्या व्यवसायावर गदा मंदिरात फुले नेण्यास बंदी

googlenewsNext

  त्र्यंबकेश्वर : मंदिरालगत फुल विक्रेत्यांचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात फुले-हार आदि पूजेचे साहित्य नेण्यास बंदी असल्याने भाविक पूजेचे साहित्य खरेदी करत नाही. त्यामुळे सदर व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील माळी समाज व अन्य फुल विक्रेत्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान अध्यक्षांना यासंबंधी एक निवदेन दिले आहे. यात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक श्रद्धेने बेल व फुले वाहतात. त्यासाठी प्रवेशद्वारासमोर फुल विक्रेते अधिकृतपणे व्यवसाय सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार सुरक्षेच्या नावाखाली भाविकांना मंदिरात नारळ, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु या आदेशात फुले व हार याला बंदी नसतांनाही भाविकांना मंदिरात फुले-हार नेण्यास मनाई असल्याने फुल विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. तरी या व्यवसायावर गदा येऊ नये, अशी मागणी फुल विक्रेत्यांनी केली आहे. या निवेदनावर गंगूबाई पाटील, संतोष पाटील, मधुकर माळी, शिलाबाई भुजबळ, भिमाबाई माळी, सुरेश माळी आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Fulamkeshwar temple at Trimbakeshwar temple is not allowed to carry floral flowers in the mud temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.