भुजबळ खटल्याच्या सुनावणीत हिरेंची पूर्ण उपस्थिती; राजकीय तर्कवितर्क, निवडणूक तयारीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:00 AM2017-11-02T01:00:53+5:302017-11-02T01:01:10+5:30
छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणा-यांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.
नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणा-या चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावरील सुनावणीत माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजी
आमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात हजेरी लावली.
छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणाºयांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.
नांदगाव मतदारसंघातून भुजबळपुत्र आमदार
पंकज यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या हिरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या राजकीय
मत परिवर्तनाचा ठाव अद्याप कोणाला लागू
शकलेला नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
काही महिन्यांपूर्वी अद्वय हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर त्याचा राजकीय अर्थ निघू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली होती. मंगळवारी भुजबळ यांच्या जामीन अर्जावर दिवसभर युक्तिवाद पूर्ण झाला. आता सरकार ८ नोव्हेंबरला त्यावर आपले म्हणणे मांडणार आहे.