पाथर्डी फाट्यावर डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:08+5:302021-08-21T04:18:08+5:30

नाशिक शहराच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी फाटा येथे महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुताऱ्यासह जमिनीपासून सुमारे तीस फूट ...

Full size statue of Dr. Ambedkar on Pathardi fork | पाथर्डी फाट्यावर डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

पाथर्डी फाट्यावर डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

Next

नाशिक शहराच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी फाटा येथे महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुताऱ्यासह जमिनीपासून सुमारे तीस फूट उंच अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याच्या अगदी समोरील बाजूस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी लागणाऱ्या शासनाच्या विविध विभागांच्या परवानगी मिळविण्याचे काम बाकी असल्याने, सदर पुतळा अद्यापपर्यंत बसविण्यात आला नव्हता. नगरसेवक राकेश दोंदे यांनी सदर पुतळा बसविण्यासाठी कलासंचनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आदी विविध ठिकाणच्या परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर पुतळा उभारण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार सुमारे तीस फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा पुतळा तयार करून बुधवारी( दि.१८ ) रात्री उशिरा हा पुतळा चबूताऱ्यावर बसविण्यात आला. यावेळी नगरसेवक राकेश दोंदे यांच्यासह नगरसेवक भगवान दोंदे मनपा बांधकाम विभागाचे अभियंता इजाज काजी, बच्छाव, राहुल दोंदे, राहुल राऊत, अंकित दोंदे, सुनील पिंपळसकर, संदीप दोंदे, अरुण जाधव, पप्पू दोंदे आदी उपस्थित होते.

(फोटो २० पुतळा्न

Web Title: Full size statue of Dr. Ambedkar on Pathardi fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.