जन्मशताब्दी वर्षानिमित्त फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:35 AM2020-12-04T04:35:51+5:302020-12-04T04:35:51+5:30

नाशिक : ज्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया ज्या नाशिकमध्ये रोवला आणि संपूर्ण देशाला चित्रपटसृष्टीची ओळख करून दिली असे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, ...

A full-sized statue of Phalke will be erected on the occasion of his birth centenary | जन्मशताब्दी वर्षानिमित्त फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

जन्मशताब्दी वर्षानिमित्त फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

Next

नाशिक : ज्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया ज्या नाशिकमध्ये रोवला आणि संपूर्ण देशाला चित्रपटसृष्टीची ओळख करून दिली असे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटसृष्टीचे निर्माते, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचे सन २०२० हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्ताने नाशकात फाळके स्मारकाचे नूतनीकरण तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी नाशिक असल्याने त्यांचा अमूल्य ठेवा व नाव चिरंतर स्मरणात राहावे आणि त्यांच्या योगदानाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी याकरिता नाशिक महानगरपालिकेने फाळके स्मारकासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केली; परंतु फाळके स्मारकनिर्मितीस बरेच वर्षांचा कालावधी लोटला असून, दरम्यानच्या काळात त्या स्मारकास अवकळा आली असल्याने त्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी महापौरपदाच्या सुरुवातीच्या काळात दौरा केल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच फाळके स्मारक येथे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु त्यावेळी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने महापौर कुलकर्णी यांनी सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाच कोटी तसेच फाळके स्मारक व बुद्ध स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटमहर्षी यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापौरांनी २ डिसेंबर २०२० रोजी आयुक्त मनपा नाशिक तसेच शहर अभियंता यांना पत्र देऊन दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होण्याच्या आधी हे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

--------------------------

Web Title: A full-sized statue of Phalke will be erected on the occasion of his birth centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.