कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास संपूर्ण सहकार्य :नरहरी झिरवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:22 IST2020-10-23T00:22:08+5:302020-10-23T00:22:37+5:30

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.

Full support for the mud ethanol project: | कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास संपूर्ण सहकार्य :नरहरी झिरवाळ

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार दिलीप बनकर आदींसह शेतकरी बांधव.

ठळक मुद्देगळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी आश्वासन; सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा

दिंडोरी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झिरवाळ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बनकर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
झिरवाळ म्हणाले, कादवा हा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तारणहार असून, चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कादवाला प्राधान्य देत आहेत. तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच कारखान्याचे डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करावे,
असे आवाहनही झिरवाळ यांनी
केले. यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प काळाची गरज असल्याचे सांगितले. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कादवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. शासनाने २५०० मे.टन प्रतिदिन गाळपास परवानगी दिली आहे. यंदा सुमारे दहा हजार हेक्टर ऊस नोंद झाली असल्याने एक महिना कारखाना लवकर सुरू केला. सूत्रबद्ध ऊसतोड कार्यक्र म आखत ऊसतोड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी मच्छिंद्र पवार (पाडे), खंडेराव दळवी (लखमापूर), विनायक देशमुख (खेडले), मधुकर बोरस्ते (हातनोरे), मीनानाथ जाधव (बोराळे) यांच्या हस्ते सपत्निक गव्हाण पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले. स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.

Web Title: Full support for the mud ethanol project:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.