जिल्हा बॅँकेत अडकला पंचायत समित्यांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:58 AM2018-05-18T00:58:10+5:302018-05-18T00:58:10+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने योजनांची शिल्लक रक्कम पंचायत समितींना त्वरित वितरित करण्याचे आश्वासन केदा आहेर यांनी याप्रसंगी दिले.

जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजना, नैसर्गिक आपत्ती, टंचाई, डॉ. अब्दुल कलाम आहार योजना, समाजकल्याण योजना, पेन्शन उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, महिला व बालकल्याण योजनांची रक्कम नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली आहे. त्यामुळे सदरच्या लोकोपयोगी योजना राबविण्यास तसेच गरजू लाभार्थींना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. सदरची बाब लक्षात घेऊन डॉ. गिते यांनी याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा करून सदरचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करण्याची मागणी केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने याबाबत त्वरित निर्णय घेऊन सदरचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करणार असल्याचे आश्वासन केदा आहेर यांनी यावेळी दिले.