सोमठाणे ते सांगवी रस्त्यासाठी ३ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:08+5:302021-04-26T04:13:08+5:30
सिन्नर तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनामार्फत मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. पूर्व ...
सिन्नर तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनामार्फत मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. पूर्व भागातील सोमठाणे मार्गे कोपरगाव तालुक्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. मात्र हा रस्ता अनेक ठिकाणी खराब असल्यामुळे प्रवाशांना या रस्त्याने प्रवास करताना काही भागांत मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सोमठाणे ते चासनळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली असून पुढील टप्प्यात तेही रस्ते मंजूर होतील, असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
इन्फो...
सोमठाणेचा रस्ता चौपदरीकरण
अर्थसंकल्पीय तरतुदीत सोमठाणे ते मेंढी रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सोमठाणे ते ब्राह्मणवाडे रस्त्यासाठी ५० लाख तर आता सोमठाणे ते सांगवी रस्त्यासाठी ३ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सोमठाणेपासून चारही बाजूंना जाणाऱ्या सांगवी, मेंढी, पांगरी व ब्राह्मणवाडे या रस्त्यांचे ठरावीक अंतरापर्यंत चौपदरीकरण करण्यात येऊन प्रत्येक रस्त्याच्या बाजूला फूटपाथ बनविण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता मजबुतीकरण होईलच. शिवाय ३ कोटी रुपयांचे बाजारतळही याच रस्त्यांच्या मध्यवर्ती भागात होणार असून त्यामुळे हा परिसर अतिशय देखणा दिसणार आहे.