ऑक्सिजन मशीनसह सिलिंडरसाठी उभारला सव्वासहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:04+5:302021-04-26T04:13:04+5:30

आता त्या निधीतून कळवण, अभोणा आणि मानूर कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधन सामग्री उपलब्ध ...

A fund of Rs | ऑक्सिजन मशीनसह सिलिंडरसाठी उभारला सव्वासहा लाखांचा निधी

ऑक्सिजन मशीनसह सिलिंडरसाठी उभारला सव्वासहा लाखांचा निधी

Next

आता त्या निधीतून कळवण, अभोणा आणि मानूर कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होणार असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

आमदार नितीन पवार यांनी कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या निधीचा धनादेश स्वीकारून आभार मानले. शिक्षकांच्या निधीचा धनादेश गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्याकडे सुपूर्द करून त्यातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधन सामग्री खरेदी करण्याची सूचना आमदार पवार यांनी केली.

कळवण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीनची मदत करावी असे आवाहन मागील सप्ताहात केले होते.

आमदार पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, आदिवासी शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख सभा, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती, मुख्याध्यापक शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गटविकास अधिकारी बहिरम, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्याशी चर्चा करून कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपसण्याची भूमिका मांडली.

कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन अवघ्या दोन दिवसात ६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी संकलित केला. या निधीतून कळवण तालुक्यातील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भूषण पगार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. नीलेश लाड, डॉ. पंकज जाधव, डॉ. पराग पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी संजय देशमुख, संजय शिंदे, संजय पाटील, भास्कर भामरे, दीपक जगताप, शामराव भोये, दीपक वाघ, बाबुलाल सोनवणे, नीलेश भामरे, सुनील गांगुर्डे, परमेश खैरनार, संभाजी पवार, दादाजी देवरे आदी उपस्थित होते.

फोटो - २५ कळवण १

कळवण येथे आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना संजय देशमुख, संजय शिंदे, संजय पाटील, भास्कर भामरे, दीपक जगताप, शामराव भोये, दीपक वाघ, बाबुलाल सोनवणे, नीलेश भामरे, सुनील गांगुर्डे, परमेश खैरनार, संभाजी पवार, दादाजी देवरे आदी.

===Photopath===

250421\25nsk_25_25042021_13.jpg

===Caption===

कळवण येथे आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करतांना संजय देशमुख, संजय शिंदे, संजय पाटील, भास्कर भामरे, दीपक जगताप, शामराव भोये, दीपक वाघ, बाबुलाल सोनवणे, निलेश भामरे, सुनिल गांगुर्डे, परमेश खैरनार, संभाजी पवार, दादाजी देवरे आदी

Web Title: A fund of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.