ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:53 AM2018-02-27T01:53:28+5:302018-02-27T01:53:28+5:30

डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

Fund sanctioned for oak storm affected | ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

Next

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकण व नाशिक विभागातील ओखी वादळग्रस्तांना मदतीसाठी निधी मंजूर केला होता. त्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. डिसेंबर महिन्याच्या ४ ते ६ तारखेच्या दरम्यान, अरबी समुद्रात ओखी वादळ सरकल्याने त्याचे परिणाम महाराष्टÑाच्या वातावरणावर झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिक जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली होती. द्राक्षबागांचा ऐन हंगामातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे नाशिक जिल्ह्णातील सुमारे दीड हजाराहून अधिक शेतकºयांच्या १२०० हेक्टरवरील द्राक्षाचे नुकसान झाले होते.  यासंदर्भात शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णात पंचनामे पूर्ण करून शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात आला होता व शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रती हेक्टरी १३,५०० रुपये भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्णासाठी २,३३,०८,२९० रुपयांची गरजही शासनाला कळविण्यात आली होती. त्यानुसार नुकसान झालेल्या आठ तालुक्यांसाठी शासनाचे निधी पाठविला आहे. सदरचे पैसे तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
तालुकानिहाय शेतकरी व रक्कम
मालेगाव (२६०)- ४५७०७४०
सटाणा (८५५)- १४६५१८२०
कळवण (३१)- ४६९९८०
देवळा (४७)- ७२८१००
दिंडोरी (२)- ९९००
नाशिक (१३)- १२३९३०
निफाड (४०)- ३७०२६०
चांदवड (२५८)- २३८३५६०
 

Web Title: Fund sanctioned for oak storm affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी