घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी मंजुर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:13 PM2018-09-05T16:13:36+5:302018-09-05T16:13:51+5:30
त्र्यंबकेश्वर : घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केल्याने नाशिक विभागात अवघ्या दोन नगरपालिकांचा समावेश करण्यात आला असून त्यात त्र्यंबकेश्वर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर नगरपरिषद यांचा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वर : घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केल्याने नाशिक विभागात अवघ्या दोन नगरपालिकांचा समावेश करण्यात आला असून त्यात त्र्यंबकेश्वर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर नगरपरिषद यांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी त्र्यंबक नगरपरिषदेला शासनाने एक कोटी पाच लाख रु पयांचे अनुदान मंत्रालयात मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला. सभागृहात बैठकीला मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे केरूरे व अन्य नगरपरिषदेचे अधिकारी होते. तर मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणसवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार याच्या समवेत दुस-या बैठकीसाठी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष स्विप्नल शेलार गटनेते समीर पाटणकर उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राज्यातील ३२ नगरपालिकांना शासनातर्फे१७८ कोटी मंजुर केले आहेत. त्यापैकी नाशिक विभागातील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेस १.०५ कोटी तर श्रीरामपुर नगरपरिषदेस ३.६७ कोटी मंजुर केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन आराखड्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची मान्यता मिळाली आहे. शहरांची स्वच्छता राखली जावी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करतानाच ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करु न त्यावर प्रक्रि या करणे यासाठी लागणाºयासाहित्य, सामुग्री तसेच प्रकल्पाचे सविस्तर माहिती देणाºया आराखड्यांचे सादरीकरण मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झाले. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने विद्यमान पालिका निवडणुकीपुर्वीच घनकचरा व्यवस्थापन करण्यास सुमारे दिड दोन वर्षापुर्वीच सुरु वात केली होती. ओला कचरा सुका कचरा विलगीकरण करण्याबाबत डॉ. चेतना मानुरे केरु रे यांनी सक्तीने करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या. कधी दंडात्मक कारवाई केली, त्यामुळे लोकांना आता सवय लागली आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाकडे ओला कच-याचे स्वतंत्र व सुका कच-याचे स्वतंत्र डस्टबीन आहेत. दररोज घंटागाडीत दोन भाग केले आहेत. घंटागाडीतील सफाई कामगार आपल्या हाताने पुनश्च विलगीकरण करु न घंटागाडीतील कप्प्यात करतात. घंटागाडी कचरा जिथे खाली करतात, तेथेच कच-याचे विलगीकरण केल्याप्रमाणे कचरा खाली करतात.येथील प्रकल्पात प्लॅस्टीक कचरा वेगळा केला जातो.