महाविद्यालयीन तरुणांनी उभारला निधी
By admin | Published: November 4, 2015 10:48 PM2015-11-04T22:48:26+5:302015-11-04T22:49:03+5:30
आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
महाविद्यालयीन
तरुणांनी उभारला निधीआत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हातनाशिक : महिनाभरापूर्वी झालेल्या ‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलन सुरू केले होते. दरम्यान, तरुणाईकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबप्रमुखाने आत्महत्त्या केलेल्या कुटुंबाला २१ हजार रुपयांची मदत दिली.
२१ हजार रुपयांचा संकलित केलेला निधी धुळे जिल्ह्यातील कविता पाटील यांना प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. विजयकुमार पाठारे व विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते, भक्ती आठवले, स्पंदन समन्वयक ऐश्वर्या गुजराथी आदिंच्या उपस्थितीत समाजातील अशा गटाला प्रोत्साहन दिल्याने ते निश्चितच चांगले काम करू शकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
गारपिटीमुळे झालेले शेतीचे नुकसान आणि झालेली पिकाची नासाडी हे दृश्य बघितले न गेल्याने सतीश पाटील यांनी आत्महत्त्या केली. पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा पाटील यांचा परिवार आता हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे चालला आहे. चार बिघे जमीन असूनही आजच्या परिस्थितीत या जमिनीतून कसलेच पीक हाती येत नाही.