अपंगांचा निधी मार्चअखेर खर्च होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:24 AM2017-09-26T01:24:17+5:302017-09-26T01:24:23+5:30
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा चार वर्षांपासून चार कोटींचा निधी अखर्चित असून, येत्या मार्च २०१८ अखेर हा निधी शंभर टक्ेक खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा चार वर्षांपासून चार कोटींचा निधी अखर्चित असून, येत्या मार्च २०१८ अखेर हा निधी शंभर टक्ेक खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिली. सुमारे चार कोटींचा तीन टक्के अपंग निधी गेल्या चार वर्षांपासून खर्च होत नाही. त्यातच येत्या बुधवारी (दि.२७) प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेऊन त्यांना अपंगांच्या योजना व त्यांच्याबाबतीच्या निधीबाबत विचारणा करणार आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांना अपंगाचा निधी खर्च होत नसल्यावरून आमदार बच्चू कडू यांनी जाब विचारल्याची घटना ताजी आहे. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी अपंग निधी नियोजनाबाबत व खर्चाबाबत आढावा घेतला. तसेच सर्व गटविकास अधिकाºयांना पत्र पाठवून अपंगांसाठी वैयक्तिक व सामूहिक स्वरूपातील असलेल्या योजनांबाबत तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहे.
या चार कोटींतील ७५ टक्के निधी हा सामूहिक स्वरूपावर, तर २५ टक्केनिधी हा वैयक्तिक बाबींवर खर्च करावयाचा आहे. या चार कोटींतील ८० लाखांचा निधी हा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत व नवीन प्रशासकीय इमारत या दोन्ही ठिकाणी लिफ्ट बसविण्यात येणार आहे. जेणे करून अपंग व ज्येष्ठ नागरिकांना या लिफ्टच्या सहाय्याने दोन व तीन मजले पार करून विभागात जाता येणार आहे.
वैयक्तिक लाभाचे १५०० प्रस्ताव प्राप्त
आतापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी हजार ते पंधराशे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र चार ते सहा हजार प्रस्ताव आल्यावर त्यांची छाननी करून त्यातील निवडक अपंग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे दीपककुमार मीणा यांनी सांगितले. येत्या मार्च २०१८ पर्यंत हा सर्व निधी खर्च करण्याबाबतचे नियोजन करण्यात आल्याचेही दीपककुमार मीणा यांचे म्हणणे आहे.