सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 02:22 PM2018-09-27T14:22:25+5:302018-09-27T14:22:37+5:30
कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख रु पयांचे आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे देण्यात आले.
कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख रु पयांचे आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे देण्यात आले. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त सभेत मान्यता घेवून सामाजिक दातृत्व पाच लाख रु पये रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे जिल्हा न्यायधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यु.एम.नंदेश्वर यांच्या हस्ते व तहसिलदार, कळवण कैलास चावडे, अॅड. अविनाश भिडे, अॅड. जयंत जायभावे, राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब शिंदे तसेच विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.