देवस्थानच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:18 AM2021-09-09T04:18:55+5:302021-09-09T04:18:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील श्री सतीदेवी सामतदादा देवस्थानला ‘ब’ दर्जा देण्यासाठी आपण प्रस्ताव सादर करू ...

Funds of Rs. 25 lakhs will be provided for the development of the temple | देवस्थानच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार

देवस्थानच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील श्री सतीदेवी सामतदादा देवस्थानला ‘ब’ दर्जा देण्यासाठी आपण प्रस्ताव सादर करू व यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक बोलावण्यात येईल. सोबतच सतीदेवी सामतदादा देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वडांगळी येथे सदिच्छा भेटीदरम्यान दिली. मंगळवार (दि. ७) रोजी राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वडांगळी (ता. सिन्नर) येथील श्री सतीदेवी सामतदादा देवस्थानला सदिच्छा भेट दिली. यावेळी समस्त बंजारा समाज तसेच देवस्थानकडून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सत्तार बोलत होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे, संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, दारासिंग चव्हाण, उपविभागीय अधिकारी माया गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब मुरकुटे, सिन्नरचे शिवसेना युवा नेते उदय सांगळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश खुले, औद्योगिक वसाहत निर्माण मंडळाचे संचालक राजेश गडाक, देवस्थानचे विश्वस्त शरद खुले, सुभाष चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान सत्तार यांनी देवस्थानच्या कामकाजाबाबत आढावा घेऊन मंदिराची पाहणी केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी बांधिलकी जपत समाजाभिमुख कार्य करणाऱ्या राज्यातील धर्मशाळा, मठ, देवस्थानांचा विकास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका असून, राज्य सरकार यासाठी उपाययोजना करत आहे, अशी माहिती देत वडांगळी येथील संस्थानचे कार्य प्रेरणादायी असून, श्री सतीदेवी सामतदादा देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

-------------------- फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे सतीमाता सामतदादा देवस्थानला राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, दीपक खुळे, सुदेश खुळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. (०७ सिन्नर ३)

070921\262607nsk_55_07092021_13.jpg

०७ सिन्नर ३

Web Title: Funds of Rs. 25 lakhs will be provided for the development of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.