चंद्रपूर शिवारातील मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:24 PM2020-02-16T18:24:50+5:302020-02-16T18:25:24+5:30
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिकारीच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडून मृत झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. घोडेवाडी शिवारात पाझर तलावाजवळ त्र्यंबक तळपे यांच्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत झाल्याचे आढळून आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोनांबे वन परिमंडळाच्या अधिकारी श्रीमती राठोड, वनपाल पी. के. सगळे, बाबुराव सदगीर,
रामेश्वर माळी, गणपत मेंगाळ आदींनी शुक्र वारी सकाळी घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. माळेगाव वनोद्यानात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.