जवान योगेश लांडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:57 AM2019-07-03T00:57:05+5:302019-07-03T00:57:49+5:30

नायगाव : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान योगेश मनोहर लांडगे यांच्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral funeral of young Yogesh Lunde | जवान योगेश लांडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जवान योगेश लांडगे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करताना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे.

Next
ठळक मुद्दे चिंचोली पंचक्र ोशीतील हजारो ग्रामस्थ व नातेवाइकांनी या जवानाच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.

नायगाव : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान योगेश मनोहर लांडगे यांच्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गांधीनगर (गुजरात) येथून मंगळवारी सकाळी ९ वाजता लांडगे यांचे पार्थिव चिंचोली येथे पोहोचले. यावेळी सजवलेल्या रथातून लांडगे वस्तीपासून निघालेली अंत्ययात्रा गावातून योगेश लांडगे अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणा देत स्मशानभूमी परिसरात पोहोचली. येथील स्मशानभूमीत त्यांचा मुलगा यशने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. देवळाली येथील आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून योगेश लांडगे यांना मानवंदना दिली. चिंचोली पंचक्र ोशीतील हजारो ग्रामस्थ व नातेवाइकांनी या जवानाच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शीतल सांगळे, दीप्ती वाजे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातपुते, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, तहसीलदार राहुल कोताडे, नाईक सुभेदार सादिक मकाणदार, देवळाली आर्टिलरीचे जगदीश
कुमार, मनोहर पाटील लिंगायत, गणेश उगले, नवनाथ ढमाले आदींनी श्रद्धांजली वाहिली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थ, महिला, तरुण व शालेय विद्यार्थ्यांनी भूमिपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून चिंचोली गावावर योगेश यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. सरपंच दत्तू नवाळे, माजी सरपंच संजय सानप, सुरेश नवाळे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजु नवाळे, के.पी.आव्हाड , व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुदाम नवाळे, तलाठी अरुण फसाळे आदींसह ग्रामस्थ व तरुणांनी अंतिम संस्कार व पार्किंगसाठी जागा स्वच्छ केली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलेल्या योगेश यांनी २००८ साली भारतीय सैन्यदलात दाखल होऊन देशसेवेचे आपले स्वप्न पूर्ण केले. रविवारी सायंकाळी गांधीनगर (गुजरात) येथून गावी (चिंचोली, ता. सिन्नर) येण्यासाठी रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी योगेश आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी सविता, मुलगा यश, मुलगी अदिती, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Funeral funeral of young Yogesh Lunde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.