सासरच्या घरासमोरच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:26 AM2017-08-22T01:26:23+5:302017-08-22T01:26:23+5:30

इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी या विवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू सासºयासह पाच लोकांविरुद्ध वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती व सासूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

 Funeral on marriage made in front of his father-in-law | सासरच्या घरासमोरच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार

सासरच्या घरासमोरच केले विवाहितेवर अंत्यसंस्कार

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी या विवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू सासºयासह पाच लोकांविरुद्ध वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती व सासूला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील पिंपळद येथील शेतकरी धोंडीराम लक्ष्मण घोलप यांची पुतनी नंदिनी (२३) हिचा विवाह वाडीवºहे येथे सागर मधुकर मालुंजकर यांच्याबरोबर ३० एप्रिल २०१६ रोजी झाला होता. विवाहच्या चार महिन्यानंतर या नवविवाहितेला घरगुती किरकोळ कारणावरून कुरापत काढून तिचा नवरा सागर मधुकर मालूजकर, सासरा मधुकर राजाराम मालूंजकर, सासू शांताबाई मधुकर मालूंजकर, चुलत सासरा अनिल राजाराम मालूंजकर, चुलत सासू मिनाबाई अनिल मालुंजकर हे सर्व छळ करत होते. या नवविवाहितेने रविवारी दुपारी २.३० ला वाडीवºहे येथे तिच्या सासरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला उपचार्थ नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले काल सायंकाळी सात वाजता तीची प्राणज्योत मालवली. असे रु ग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यानंतर सोमवारी संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी वाडीवºहे पोलीस स्टेशन गाठून जोपर्यंत संशियत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्य संस्कार होणार नाही अशी भूमिका घेत गोंधळ घातला. दरम्यान संशियतांना ताब्यात घेतल्यानंतर मयत नंदिनीच्या माहेरच्यांनी तिचे प्रेत तिच्या सासरच्या घरासमोर आणून तिथंच तिचा अंत्यसंस्कार केला. दरम्यान मयत नंदिनीचे चुलते धोंडीराम घोलप यांनी दिलेल्या फिर्यादिवरु न वाडीवºहे पोलिसांनी मयत महीलेचा नवरा, सासु सासरा, चुलत सासु सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे ,पोलिस निरीक्षक एस डी देशमुख, उपनिरीक्षक आठवले यांनी संतप्त जमावाला शांत करीत, समजूत काढून संशियताविरोधात कठोर शासन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
पैशांसाठी तगादा
नंदिनीस दिवस गेल्यानंतर बाळंतपणासाठी झालेल्या दवाखान्याचा खर्च म्हणून ४० हजार रु पयांची मागणी तिच्या सासरच्या नातेवाइकांनी करून तो खर्चही भरून घेतला होता. तरीही तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीच्या मशागतीसाठी व बी- बियाणांसाठी एक लाख रुपये खर्च माहेरून घेऊन ये, असा तगादा लावला होता. हे पैसे आणू न शकल्याने नंदिनीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

Web Title:  Funeral on marriage made in front of his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.