संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By admin | Published: November 22, 2015 11:16 PM2015-11-22T23:16:52+5:302015-11-22T23:17:24+5:30

संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Funeral today on Sandeep Shailaj | संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Next

जायखेडा : जम्मूतल्या बारामुल्ला येथे दोन दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झालेले भारतीय सैन्यदलातील जवान संदीप संतोष ह्याळीज यांच्या मृत्यूनंतर तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटूनही त्यांचे पार्थिव आखतवाडे या त्यांच्या मूळगावी पोहचू शकले नाही. भूमिपुत्राच्या अखेरच्या दर्शनासाठी ह्याळीज कुटुंबीयांसह आखतवाडेकरांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. आजही नातेवाईक आप्तेष्ट व मित्रपरिवाराची सांत्वनासाठी त्यांच्या मळ्यातील घरी दिवसभर रिघ लागलेली होती. दरम्यान जम्मूतील वातावरण विमान उड्डाणासाठी अनुकूल नसल्याने उशीर होत असल्याचे सैन्य दल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी हवालदार ह्याळीज यांचा जम्मूतल्या बाडामुल्ला येथ अकस्मात मृत्यु झाल्याचे सैन्यदल प्रशासनाने दूरध्वनीवरु न त्यांच्या कुटुंबियांना सांगितले मात्र त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान रविवारी (दि.२२) रात्री उशिरा त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणले जाणार असून, सोमवारी (दि.२३) सकाळी मुंबईहून आखतवाडे (ता. बागलाण) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव आणले जाणार
आहे.
सोमवारी (दि.२३) सकाळी आठ वाजेदरम्यान आखतवाडे (ता. बागलाण) या त्यांच्या मूळ
गावी त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Funeral today on Sandeep Shailaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.