सप्तश्रृंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उदघाटनाला मुहूर्त काही लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:48 PM2018-03-16T14:48:56+5:302018-03-16T14:48:56+5:30

कळवण- उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

The funicular trolley on Saptashrunggad will start at the inauguration. | सप्तश्रृंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उदघाटनाला मुहूर्त काही लागेना

सप्तश्रृंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उदघाटनाला मुहूर्त काही लागेना

Next

कळवण- उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याने देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. ४ मार्च ही तारीख निश्चित झाली होती परंतु अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व तांत्रिक कारणामुळे १७ मार्च ही तारीख निश्चित झाली होती. १७ मार्च रोजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे निश्चित झाल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने बैठकावर बैठका घेऊन नियोजनाची जय्यत तयारी करु न रंगरंगोटी, साफसफाई, हेलीफॅड, डागडुजी, दुरु स्ती, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर कंबर कसले असतांना पुन्हा एकदा फाल्गुन अमावस्या येत असल्याचे निमित्त करु न लोकार्पण सोहळा पुढे ढकलला. आता २२ मार्च ही तारीख निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. गडावर दर्शनाची सुलभता व्हावी म्हणून कार्यान्वित झालेला देशातील पहिल्याच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाल्याने १७ मार्च रोजी सकाळी या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून निश्चित झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पाशर््वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली होती. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर अनेक अडचणींना तोंड देत खाजगीकरणातून देशातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रयोग पूर्णत्वास आल्याने या प्रकल्पाच्या उदघाटन व लोकार्पन सोहळ्यासाठी फडणवीस यांना आमंत्रित करण्यासाठी नागपूर येथून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते कळवण येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांची व श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांची संयुक्त आढावा बैठक घेऊन मुखमंत्र्याच्या संभाव्य दौर्याबाबत व चैत्रोत्सव यात्रा नियोजनाबाबत विभागाने केलेल्या व करावयाचे तयारी बाबत आज आढावा घेऊन सुचना केल्या.दरम्यान, नांदुरी येथे आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हेलिपॅड बनवण्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले असून नांदुरी ते सप्तश्रृंग गड घाट रस्त्याची डागडुजी, कठड्यांना रंगरगोटी, साईड पट्टयांची साफसफाई, वनविभागाकडून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदाई आदी कामे युध्दपातळीवर सुरु करण्यात आली. ग्रामपंचायत, सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने गडावर प्लॅस्टिक बंदी व ग्रामस्वच्छतेच्या दृष्टीने वेगाने कामे सुरु करण्यात आली होती. २५ मार्च पासून सप्तशृंग गडावर सुरु होणार असल्याने चैत्रोत्सवापूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली भाविकांसाठी सुरु होऊन यंदाच्या चैत्रोत्सवात साडेपाचशे पायऱ्या चढु न शकणारे वृध्द, अपंग भाविकांबरोबरच जलद गतीने आदिमाया भगवतीचे दर्शन घेवू इिच्छणारे भाविक सहजतेने देवीचरणी लीन होण्यास मिळावे अशी अपेक्षा देवीभक्तांची आहे.१७ मार्च मुळे देवी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमावस्या असल्याने दौरा रद्द केला असून २२ मार्च ही तारीख लोकार्पण सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आली असल्याचे समजते.

Web Title: The funicular trolley on Saptashrunggad will start at the inauguration.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक