टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली नगरी

By admin | Published: November 23, 2015 12:11 AM2015-11-23T00:11:01+5:302015-11-23T00:11:17+5:30

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त दिंडी सोहळा

Furious city with the scorching heat of Garuda mrudanga | टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली नगरी

टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली नगरी

Next

नाशिक : संत नामदेव महाराज यांच्या ७४६ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. भक्तांनी दिंडीत सहभागी होत नामदेव महाराजांचा एकच गजर करीत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.
बी. डी. भालेकर मैदान येथून दिंडीस प्रारंभ करण्यात आला. सजावट केलेल्या रथात संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह.भ.प. नामदास महाराज नामदेवांच्या पादुका घेऊन विराजमान झाले होते. तसेच रथात नामदेवांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रतिमेचे पूजन आयोजक अरुण नेवासकर व अर्चना नेवासकर यांच्या हस्ते करण्यात आले. पालखीची मेनरोडमार्गे कापड बाजार येथून विठ्ठल मंदिर येथे हरिहर भेट कार्यक्रमात महाआरती करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशा पथक, भजनी मंडळ, लेजीम पथक आदिंसह पेशवाई थाटात अश्वावर विराजमान झालेल्या युवती दिंडीत सहभागी झाल्या.
दिंडीत ‘बेटी बचाव’ हा संदेश लोकांना देण्यासाठी चित्ररथ सजवून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी श्रीकांत बेणी, साहित्यिक नंदन रहाणे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रवक्ते दिलीपराव तुपे, नाना निकुंभ, विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप खैरनार, क्षत्रिय अहिर शिंपी समाज केंद्रीय संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जगताप, अंकुश पवार, ज्ञानेश्वर औसरकर, सूर्यकांत धटिंगण, शांता नेवासकर, शीला माळवे, अनुराधा धटिंगण, रंजना टिबे, दिलीप जगताप, अनिल नेवासकर, सतीश भांबेरे, रत्नाकर लुंगे, योगेश वारे, रमेश चांडोले, अरु ण भांबेरे, प्रवीण पवार, अजय देव्हारे, देवेन कल्याणकर, हेमंत सोनवणी, संजय खैरनार, रमेश नवले, राजेंद्र करमासे, दत्ता वावधाने, संजय गिते, अशोक जगताप, अमर सोनवणे, ज्ञानेश्वर चांडोले, योगेश वाडेकर, मदन बोरसे, प्रदीप जगताप, रोहन नेवासकर, सचिन बोरसे, शेखर निकुंभ, रवींद्र जाधव, अजय खैरनार आदि सहभागी झाले होते. दिंडीची सांगता नामदास महाराज यांनी पंढरपूर येथून आणलेल्या श्री नामदेवांच्या पवित्र पादुकांना रामकुंडात अमृताभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी अमृतस्नानाची संधी साधली. कार्यक्रमाचा समारोप महाआरतीने करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Furious city with the scorching heat of Garuda mrudanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.